शेतकर्‍यांच्या हितार्थ राष्ट्रवादीची मोहीम

0
10

गोंदिया : तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा सोमवार (दि.१४) राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली येथे जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत शहराच्या प्रभाग-१ मध्ये होणार्‍या निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी इच्छुक उमेदवारांना आवेदन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच खा. प्रफुल्ल पटेल व आमदार राजेंद्र जैन यांनी घेतलेल्या निर्णयावर सर्वांनी अमल करण्याचे निवेदन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे शेतकर्‍यांच्या हितात उच्च न्यायालयात राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश प्रमुख अन्ना धोंडगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची माहिती देण्यात आली. जिल्हाध्यक्ष हरिणखेडे यांनी सदर जनहित याचिकेच्या सर्मथनात शेतकरी-शेतमजूर कृती समितीद्वारे तयार केलेले अर्ज भरून उच्च न्यायालयात सर्व शेतकर्‍यांद्वारे पाठविण्याचे आवाहन कार्यकर्ते व सर्व पदाधिकार्‍यांना केले.
सभेला शहर अध्यक्ष शिव शर्मा, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, प्रदेश प्रतिनिधी अशोक गुप्ता, सूरज गुप्ता, हुकूमचंद अग्रवाल, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे, नगरसेविका सुशीला भालेराव, शहर महिला अध्यक्ष आशा पाटील, नरेंद्र हालानी आदींनी संबोधित केले.