आनंदच्या दातृत्वाला शिक्षण विभागाच्या कर्तृत्वाची झालर

0
12

आमगाव:  आनंद सरवदे या ध्येयवेड्या शिक्षकाचे डिजीटल शाळेचे स्वप्न साकार करण्यासाठी ९ मार्चच्या रात्री जिल्हा परिषद गोंदियाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी  जि.प. प्राथमिक शाळा रामजीटोला येथे भेट दिली.
शिक्षण विभागातील विविध कामे आटोपून शासकीय व्हिडीओ कॉन्फरन्स रात्री ७ वाजतापर्यंत उरकून रामजीटोला येथील रात्रीच्या पालक सभेची माहिती मिळताच उल्हास नरड यांनी या सभेची दखल घेत सहपरिवार भेट दिली. गावातील चौकात हनुमान मंदिरासमोर सभा आयोजित केली होती. शिक्षक आनंद सरवदे यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. शाळा डिजीटल करण्यासाठी आर्थिक अडचणी सोहमच्या वाढदिवसाला जमावलेली राशी २0 हजार रुपये शाळा डिजीटल करण्यासाठी देण्याचे कबूल केले होते. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या  गोंदिया येथे आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनाने प्रेरीत होऊन शिक्षक आनंद सरवदे यांनी २0 हजार रूपये भेट दिले. शिक्षणाधिकारी नरड यांनी सर्व गावकर्‍यांचे कौतुक करून डिजीटल शाळेचे महत्व व गरज पटवून दिली. सर्व गावकर्‍यांनी शाळेला आर्थिक मदत देण्याची कबूली दिली.
शिक्षक आनंद सरवदे यांनी नरड यांच्या हस्ते सभेत २0 हजार रुपये सरपंच माया उईके यांच्या स्वाधीन केले.शिक्षणाधिकार्‍यांनी रात्री शाळेला भेट देवून ज्ञानरचनावादी वर्गाची पाहणी केली.स्वाती सरवदे यांच्याशी नरड यांनी चर्चा करून पतीच्या शैक्षणिक कार्यात डोळसपणे सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले. शाळा डिजीटल करण्यासाठी अनेक नागरिकांनी सहकार्य केले.