युवक राष्ट्रवादीन राबविले प्रतापगड परिसरात स्वच्छता अभियान

0
12

गोंदिया : महाशिवरात्रीच्या पर्वावर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र प्रतापगड पहाडीवरील शिव मंदिरात लाखो श्रद्धाळूंचे आगमन होते. येथे ते भगवान शिव यांचे पूजन करून दर्शन घेतात. सहा दिवसांपर्यंत भाविकांचे सतत आगमन होते. मनोहरभाई पटेल अकॅडमी व इतर संस्थांच्या माध्यमातून येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्याला ते लाभ घेतात. येथे लाखो भाविकांच्या ये-जामुळे ठिकठिकाणी कचरा जमा होते. मनोहरभाई पटेल अँकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांच्या आवाहनावर जिल्हा युवक राष्ट्रवादी, जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी तसेच जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी प्रतापगड परिसरात स्वच्छता अभियान राबविले. त्यानुसार मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍यांची स्वच्छता करण्यात आली. महाप्रसाद व नागरिकांच्या येण्या-जाण्यानंतर ठिकठिकाणी जमा झालेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. सदर स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस व स्वयंसेवी संस्थेचे सदस्य केतन तुरकर, सावन बहेकार, अनिल मेहता, कमलेश पटेल, आशिक जैन, अभिजित परिहार, राहुल शहारे, अविनाश जांगडे, सुनील लोणारे, अनिल लोणारे, पूर्वेश पटेल, प्रतिक पटेल, सोनू येडे, शशांक लाडेकर, बंटी शर्मा, शाहबाज खान, विकास फरकुंडे, पंकज पटेल, कमलेश राणे, पवन सोयाम, अलाउद्दिन शेख, हेमराज मेश्राम, पिंटू वंजारी, दुष्यंत रेभे, रूचिर देशमुख, ललीत नागपुरे, प्रमोद लिल्हारे, बब्बू वाजपेयी, लक्ष्मी नागपुरे आदींनी सहकार्य केले.