23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home राजकीय ग्राम विकासासाठीसाठी सहकार्य करणार-आमदार नानाभाऊ पटोले

ग्राम विकासासाठीसाठी सहकार्य करणार-आमदार नानाभाऊ पटोले

0
40

अर्जुनी मोरगाव,दि.16ः ग्रामविकास युवा परिवर्तन मंच इटखेडाचे सरपंच व सर्व नऊ सदस्य प्रचंड मताने निवडून आले. आज माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. हि माझ्यासाठी अभिमानाची बाब असून मी या इटखेडा गावाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करणार. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा देणार असल्याचे प्रतिपादन आमदार नानाभाऊ पटोले यांनी केले.
इटखेडा येथे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचे हस्ते व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, गोंदिया जि.प. चे उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, कांग्रेस तालुकाध्यक्ष प.स. सदस्य घनशाम धामट, जि.प.सदस्य पोर्निमाताई ढेंगे, श्रीकांत घाटबांधे, प.स.सदस्य भाग्यश्री सयाम, जिल्हा उपाध्यक्ष भागवत नाकाडे, प्रमोद लांजेवार, राकेश जयस्वाल, आर.के. जांभूळकर, विकास लांडगे, उद्धव मेहंदळे, इंद्रदास झिलपे, सुभाष देशमुख, गजानन नाकतोडे, राजू पालीवाल, इटखेडा येथील सरपंच आशाताई झिलपे व इतर मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले होते.
नानाभाऊ पटोले याप्रसंगी म्हणाले कि, इटखेड्यासी माझे आतापर्यंत प्रेमसंबंध जुळेले आहे ते कायम ठेवणार. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देणार असल्याचे सांगितले. आज सामान्य जनता महागाईत होरपडली जात आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेच्या विरोधात विद्यमान शासन असून धनाचा बोनस सुद्धा शासनाने अद्याप दिलेला नाही. जनता भाजप ला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले. आमदार चंद्रिकापुरे म्हणाले कि, परिवर्तन मंच ने खरोखर गावात काही दिवसातच परिवर्तनाची चुणूक दाखवली, गावाचे सौंदर्य खुलविले. ग्रामविकासासाठी निश्चितच सहकार्य करणार. सरपंच आशाताई झिलपे यांचा वाढदिवस, संक्रातीचा गोडवा अन त्यात सत्कार सोहळ्याचे आयोजन प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर म्हणाले कि, ग्रामपंचायत ने केलेल्या विकास कामाला जिल्हा परिषद निश्चीतच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. लोकपाल गहाणे यांनी परस्परातील हेवेदावे लोकप्रतिनिधीनी तिळगुळ खाऊन बाजूला ठेवावे असे म्हणाले. दिलीपभाऊ बन्सोड, भाग्यश्री सयाम, राकेश जयस्वाल, व इतरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
शिवछत्रपती चौक ग्रामपंचायत परिसरात सत्कार सोहळ्याचे निमित्य साधून बहावा, आपटा, बकुळाचे वृक्षारोपण आ. चंद्रिकापुरे, इंजि. यशवंत गणवीर, नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे उपस्थितीत करण्यात आले. आजच्या सोहळ्याचे साक्ष मानून या झाडाचे संगोपन करावे असे आ. चंद्रिकापुरे म्हणाले.

नवनिर्वाचित सरपंच आशाताई झिलपे उपसरपंच आशीर्वाद लांडगे, ग्रा.प. सदस्य संजय कांबळी, रमेश कुंभरे, सचिन लांजेवार, वर्षा कावळे, छाया धांडे, उज्वला गोंडाणे, छाया लोणारे, सिमा कोटरंगे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिक गोविंदा मेहंदळे, नारायण राउत, माणिक गडपाल, हरिदास प्रधान, अर्जुन कोरचे यांचासुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप स्नेह भोजनाने करण्यात आला. यावेळी इटखेडा, इसापूर खामखुरा, माहूरकुडा, वडेगाव, बुधेवाडा येथील बरेच नागरिकांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास युवा परिवर्तन मंच चे उद्धव मेहंदळे, संचालन मोरेश्वर मिसार, आभार इंद्र्दास झिलपे यांनी मानलेत. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी छबील बुराडे, दीपक दुपारे, हेमंत मिसार, नंदकिशोर झिलपे, तुकाराम मडावी, सर्वेश धांडे, नीतीन कावळे, भोजेश झिलपे, वासुदेव गोठे, संजय मैंद, हेमराज राउत, कुणाल झिलपे, गोवर्धन कांबळी, देवराम दुपारे, विजय मेहंदळे, आनंदराव मेहंदळे, श्रीकांत ठाकरे, लक्ष्मीकांत मेश्राम, दिनेश सौंदरकर, भूषण कुंभलवार, हरिदास जीरीत्कार, समीर गोंडाणे, रुशिकेत गोठे, चेतन शेंडे, कुंडलिक लोणारे, मनोज अनवले व इतरांनी परिश्रम घेतले.
शाहिरी थाटात नानाभाऊ, चंद्रिकापुरे, इंजि. गणवीर
सत्कार समारंभाला ग्रामस्थांनाचा आनंद ओसंडून वाहत होता. मान्यवर अतिथींचे ग्रामपंचायत मध्ये आगमन होताच शाहिरांचे पोवाडे सुरु असताना आमदार चंद्रिकापुरे इंजि. यशवंत गणवीर, इतर अथितीनी ढोलकी, तुनतुना, खंजेरी टाळ मृदुंगाच्या तालावर पोवाड्याचा आस्वाद घेतला. चंद्रिकापुरे, गणवीर यांच्या हातातील टाळ कलावंताचे दर्शन घडवीत होते. यावेळी भगिनी मंडळाचे लेझीम नृत्य सुद्धा लक्षणीय ठरले.
आमदार नानाभाऊ पटोले स्नेह भोजनानंतर मंचावरील शाहिरांचा जोश बघता त्यांचे सुद्धा हात खंजेरीवर थिरकले. शाहिराची कला भाऊंच्या नसा-नसातून दर्शन घडवीत होते. शाहिरी कलाकार मधुकर मेहंदळे, दादाजी कार व नानाभाऊ ग्रामस्थासमवेत कलेचा यावेळी आस्वाद घेतला ग्रामस्थांनी सुद्धा बरीच साद यावेळी दिली. भाऊतील कलाकारी गुणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत पसरलेली आहे.