काँग्रेसला विरोधी पक्षाचा हक्क नाकारणे अन्याय ठरेल- शिवसेना

0
6

मुंबई-विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा हक्क नाकारणे म्हणजे काँग्रेस पक्षावर अन्याय ठरेल, असे शनिवारी शिवसेनेकडून सांगण्यात आले. भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर शुक्रवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधानसभेत रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आणखीनच जोरदार चुरस निर्माण झाली होती. कायदा व नियमाने पाहाल तर विरोधी पक्षनेते पद त्यालाच मिळावे ज्याचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पाचेक आमदार निलंबित झाले हा मुद्दा येथे येत नाही, पण निलंबित आमदारांना मोजून काँग्रेसचा आकडा कमी दाखवला व त्याचा लाभ राष्ट्रवादीला झाला तर तो न्याय होणार नाही, असे शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा सांगितला. विधानसभेत काँग्रेस विरोधी पक्षाचा हक्क नक्की मिळवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.