लोकांच्या हाताला काम उपलब्ध करूण देणे माझे प्रथम कर्तव्य राहील-धर्मरावबाबा आत्राम

0
15

◆ देवरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्मा विश्राम ग्रुहात पत्रकार परिषद चे आयोजन.
देवरी,ता.२०: लोकसभा निवडणूक २०२४ डोळ्यापुढे ठेवून माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांशी भेटी-गाठी व चिमूर -गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ते यांचे बळकटीकरण करण्याचे कार्यास सुरुवात करीत आहोत. तसेच चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रात मोठे उद्योगधंदे स्थापन करून क्षेत्रातील लोकांच्या हाताला कामे व रोजगार मिळवून देणे हे माझे प्रथम कर्तव्य राहील आणि विधानसभा क्षेत्रातील तालुक्यात व क्षेत्रात प्रत्येक महिन्याला मी भेट देत राहील व जनतेशी सतत संपर्कात राहून जनसंवाद साधून लोकोपयोगी कामे पूर्णत्वास कसे नेता येईल यावर माझा जास्त भर राहील. असे मत माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शनीवार (ता २० मे.) रोजी देवरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामग्रुहात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलून दाखवीले.
या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशूराम, विधानसभा क्षेत्राचे नेते रमेश ताराम, देवरी तालुकाध्यक्ष सी.के. बिसेन,माजी जि.प. सदस्य बीसराम चर्जे, साखरीटोलाचे प्रभाकर दोनोडे, भैय्यालाल चांदेवार, सुजीत अग्रवाल यांच्यासह देवरी तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.