सविंधानविरोधी नक्षल्यांच्या विषारी विचारांना जमिनीत गाडून टाकूया : ना.सुधीर मुनगंटीवार

0
16

– सशस्त्र दुरक्षेत्र बेसकॅम्प मुरकुटडोहचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

गोंदिया,दि.20- बंदुकी, तलवारीच्या जोरावर आतंकवाद पसरविणे हे सविधानाला मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आतंकवादी व नक्षलवादी घटनांवर आळा बसला आहे. जगात आमच्या देशातले सैन्य व राज्यातील पोलिस सर्वात शौर्यवान व निडर आहेत. मी त्यांचे कौतुक करतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या या सिमाभागातील संगमावर केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून हे बेसकॅम्प तयार करण्यात आले आहे. या संगमावरून नक्षलवाद्यांना कंठस्रान मिळेल व ते यमसदणी जातील. अश्या सविंधानविरोधी नक्षल्यांच्या विषारी विचारांना गाडून टाकूया असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री व  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते आज २० मे रोजी सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह क्रं.३ येथे सशस्त्र दुरक्षेत्र बेसकॅम्पच्या सुसज्ज इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी खा.अशोक नेते, गडचिरोली गोंदिया नक्षल पोलिस उपमहानिरिक्षक संदिप पाटील, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, सरपंच जमनाबाई मरकाम, शंकर मडावी आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना मुनगंटीवार म्हणाले की, शेतकरी, विधवा, निराधार, दिव्यांग, आजारी व जनसामान्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या बऱ्याच कल्याणकारी योजना आहेत. मात्र, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्या योजना पोहोचविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी खा.अशोक नेते यांनी सांगितले की, या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी या नात्याने येथील नागरिकांच्या विकासासाठी प्रत्येक योजनांचा लाभ मिळवून देण्याकरीता आपण प्रयत्नशिल असल्याचे ते बोलले.
आपल्या प्रास्ताविकातून उपसंचालक संदिप पाटील म्हणाले की, २०१९ पासून सुरू असलेल्या या सशस्त्र दुरक्षेत्रच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामामुळे शासनाची योजना यशस्वी होत आहे. या परिसरातील नक्षल गतीविधी संपलेली आहे. पोलिस हे आपले बंधू आहेत. आपन सर्वांनी शिक्षणाचा महत्व समजून घ्यावा व आपल्या पाल्यांना शिक्षित करावे व शिक्षित व्हावे, तेव्हांच आपण प्रत्येक योजनेचा लाभ घेवू शकतो.
इमारतीचे लोेकार्पण प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी फित कापून केले व इमारतीची पाहणी केली. तद्नंतर दादालोरा योजनेतून विद्यार्थ्यांना सायकलीचे वितरण तसेच गावकऱ्यांना धान्य व बियाण्यांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात महसूल विभागातर्फे गावात लावलेल्या शिबिरातून तयार करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन अपर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व गावकरी उपस्थित होते.  यावेळी आरोग्य तपासणी शिबिर व कृषी मागदर्शन गाकºयांसाठी ठेवण्यात आले होते.

हे बेसकॅम्प तीन राज्याच्या संयुक्त कारवाईचे केंद्र

२०१९ मध्ये मंजुर झालेल्या मुरकुटडोह क्रं.३ येथे तयार झालेल्या या इमारतीचे लोकार्पण आज झाले. मात्र मंजुरी मिळताच बांधकामाला प्रारंभ झाला होता. १.५७ हेक्टर जागेवर हे बेसकॅम्प तयार करण्यात आलेले आहे.  हे गाव व परिसर नक्षलग्रस्त असून मुरकुटडोह १, २, ३, दंडारी, टेकाटोला, दलदलकुही आदी गावे आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सिमेवर असलेल्या या बेसकॅम्पवर तिन्ही राज्याच्या पोलिसांमार्फत संयुक्त कारवाई करता येईल.