उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक विवेक नखाते भाजपमध्ये, डॉ. परिणय फुके यांचा हस्ते प्रवेश

0
11

भंडारा. तेजस्वी आणि महाराष्ट्र सरकारमधील यशस्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रगतीशील कामांमुळे प्रभावित होऊन अनेकजण राजकारणाच्या क्षेत्रात भाजपकडे वळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाचा विस्तार होत आहे.याच क्रमाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीवेळी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक विवेक आनंदराव नखाते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचा हस्ते पक्षाचा दुपट्टा घालून भाजपमध्ये प्रवेश केला.या प्रवेशावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे संघटन मंत्री बाळाभाऊ (वीरेंद्र) अंजनकर, भगवान बावनकर, विनोद थानथराटे, सौ रमाताई गौरीशंकर भुरे, संजय कुंभलकर आदी उपस्थित होते.