महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा(ED) होत असलेला गैरवापर थांबवावा

0
9

गोंदिया-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या च्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने इडी कडून चौकशी केली असल्याच्या निषेधार्थ माननीय खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्हा राकापाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एनआयबी, अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करुन विरोधी पक्ष व लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत आहे यावेळी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापराबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,यशवंत गणवीर, अशोक सहारे, पुजा सेठ, श्री केतन तुरकर, निरज उपवशी, माधुरी नासरे, विनित सहारे, अखिलेश सेठ, किरणं पारधी, हरिराम आसवाणी, नागरतन बनसोड, नागो बनसोड, राज शुक्ला, हरबक्ष गुरणानी, नरहरप्रसाद मस्करे, सुनिल पटले, शैलेश वासनिक, रमेश कुरील, राजु येडे, रौनक ठाकूर, कपिल बावनथडे, कान्हा बघेले, मंगेश रंगारी, कुनाल बावनथडे, नरेंद्र बेलगे सहीत बहुसंख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.