तुमसरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
30

भंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष लढलेले डॉ. अजय तुमसरे यांनी माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी आमदार सेवक वाघाये, साकोली तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, विजय दुबे, सभापती विनायक बुरडे हे उपस्थित होते.
डॉ. तुमसरे यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून १४ हजार ८00 मते मिळविली होती. तुमसरे हे परमात्मा एक सेवक मंडळाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे साकोली तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे.
आगामी नगरपंचायत निवडणुक त्यांच्या नेतृत्वात लठविली जाणार आहे. तुमसरे यांच्या पक्ष प्रवेशावेळी माजी आमदार सेवक वाघाये, साकोलीचे काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदू समरीत, विजय दुबे, प्रफुल्ल शामकुवर, भाऊराव झलके यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.