खबरदार, सूर्य तुफान आग ओकतोय

0
6

 

जैसलमेरमध्ये पाऱ्याने गाठलाय  52.4 अंश तापमान 

नवी दिल्ली/जैसलमेर(वृत्तसंस्था) -यावर्षी सूर्य प्रचंड आग ओकताना दिसत आहे. परिणामी, संपूर्ण देशात उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. राजस्थानातील जैसलमेरमध्ये आज उच्चांकी 52.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राजस्थानातील फलोदी येथेही 46.5 अंश सेल्सिअस तापमान होते. तेलंगणमधील बहुतेक शहरांतील तापमान 45 अंशांवर होते.


उष्णतेच्या दाहकतेत राजस्थान होरपळून निघत आहे. या राज्यातील श्रीगंगानगर येथे 46.3, चुरूमध्ये 46, बिकानेरमध्ये 45.8, बारमेरमध्ये 45.2 आणि जयपूरमध्ये 43.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उत्तर प्रदेशातही उन्हाच्या झळा जाणवत आहेत. अलाहाबादमध्ये 45.1 अंश सेल्सिअस तापमान होते. हरियानातील हिस्सारमध्ये 44.7, तर पंजाबमधील अमृतसरला 42.2 अंश सेल्सिअस तापमान होते. 

तापमानात काहीशी घट झाल्यामुळे ओडिशाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी भवानीपाटण येथे 45.5 अंश, तर राजधानी भुवनेश्‍वरमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान होते. झारखंडातील जमशेदपूर 44.2, पलामूँ 43.8, गढवा 43 आणि रांची व लोहारदगा येथे प्रत्येकी 40 अंश सेल्सिअस तापमान होते. पश्‍चिम बंगालमध्ये कोलकात्यात 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बिहारमध्ये गया शहरात 42.9 आणि पाटण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान होते.