पोलिसांच्या कलमा माझ्यासाठी मेडल-राजेंद्र पटले

0
20

मोहाडी : पोलिसांनी कोणाच्याही दबावात येऊ नये. त्यांनी निपक्षपणे कर्तव्य बजवावे. ठाणेदारांनी सिंघमची भूमिका बजवावी. मी न्यायाच्या व सत्याच्या नेहमी पाठीशी राहत आलो आहे. शेतकरी, मजूर, युवकांच्या भल्यासाठी अनेक मार्चे, आंदोलन केले आहे. त्या वेगवेगळ्या आंदोलनात माझ्यावर पोलिसांनी कलमा लावल्या त्या कलमा मी माझ्यासाठी मेडलच समजतो, अशी गर्जनायुक्त प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी केले.यावेळी प्रा. डॉ. सुनील यवळे, माजी सरपंच अनुप उटाणे, नितेश फुलेकर, राजकुमार बांते यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले. सभेचे संचालन राजू उपरकर, आभार मेघा उटाणे यांनी मानले.
कान्हळगाव (सिरसोली) येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर एका तरूणीला मारहाण झाली. त्या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद रजिस्टर करून आरोपीला सोडून दिले. आरोपीला अटक करावी, तरूणीचे बयान पुन्हा महिला पोलिसांकडून नोंदविण्यात यावे, आदी मागण्यांसाठी कान्हळगाव, सिरसोली येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणात आंदोलनाची भूमिका निश्‍चित करण्यासाठी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत जनतेला संबोधित करताना शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले बोलत होते.
शांतता सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मेघा उटाणे होत्या. मंचावर उपसरपंच राजू उपरकर, आंधळगावचे ठाणेदार मनोज काळबांधे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर कस्तुरे, सतीश ईटनकर, रक्षा बागडे, राजकुमार बांते, प्रा. डॉ. सुनिल चवळे, सिनेट सदस्य नितेश फुलेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना, राजेंद्र पटले म्हणाले, काही पक्षाच्या नेत्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांचा त्यांनी जाहीर निषेध केला. या प्रकरणात तरूणीला न्याय मिळालानाही तर मी कान्हळगावासीच्या लोकांसोबत राहून ५ मे च्या मोच्र्याचे नेतृत्व करणार आहे तसेच पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक करावी असा इशारा पोलिस प्रशासनाला दिला आहे.