अर्जुनी मोरगाव तालुका भाजपा अध्यक्षपदी विजय कापगते यांची नियुक्ती

0
33

= अनेकांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश =
अर्जुनी मोर. :–  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यात जिल्हा कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यामध्ये गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष म्हणून एॅड. येशुपाल उपराडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात जिल्हा कार्यकारणीसह तालुका अध्यक्षाची निवड गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष एड येशुलाल उपराडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे. यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुका भाजपा अध्यक्षपदी पुन्हा विजय नामदेव कापगते यांची निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारणी मध्ये सुद्धा निवड करण्यात आली. यामधे जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्षपदी प्रकाश गहाणे, रत्नदीप दहिवले, यांची नियुक्ती करण्यात आली तर जिल्हा कार्यकारणी महामंत्री म्हणून पंचायत समिती सदस्य डॉ. नाजूक कुंभरे यांची नियुक्ती करून त्यांचे वर दौरा आणि सभा नियोजनाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. तसेच महिला मोर्चा जिल्हा महामंत्री पदी ममता भैय्या यांची निवड करण्यात आली. तर अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा महामंत्री पदी एड. पोमेश्वर रामटेके यांची निवड करण्यात आली. नव्याने अर्जुनी मोरगाव तालुका भाजपा अध्यक्षपदी निवड झालेले विजय नामदेव कापगते यांनी आपल्या निवडीचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हा भाजपा अध्यक्ष एड. येसूपाल उपराडे ,भंडारा, गोंदिया समन्वयक वीरेंद्र अंजनकर यांना दिले आहे. नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद सदस्य रचना गाहाणे, लायकराम भेंडारकर, चामेश्वर गहाणे, उमाकांत ढेंगे, पौर्णिमा ढेंगे, नूतन सोनवाणे, संदीप कापगते, विनोद नाकाडे, व्यंकट खोब्रागडे, भोजू लोगडे तथा तालुक्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे