डॉ.जमशीद सय्यद यांची कॉंग्रेस डॉक्टर सेलच्या पाथर्डी ता.अध्यक्षपदी निवड

0
2

पाथर्डी-अल्पावधीतच आपल्या समाजिक कार्याचा वैद्यकीय क्षेत्रासह इतरही क्षेत्रात ठसा उमटविणारे डॉ. जमशीद सय्यद यांची पाथर्डी तालुका काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.डॉ जमशीद सय्यद यांनी कोरोना काळात शहर व तालुक्यात आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्यांसाठी जी काही मदत करता येईल ती केली.तसेच इतर वेळेतही आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सर्व सामान्यांसाठी जे काही सहकार्य करता येईल त्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.त्यांची हिच सेवाभावी वृत्ती पाहून पाथर्डी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष नासिर शहानवाज शेख व करंजी पंचायत समिती मंडळ गण अध्यक्ष संपतरावं क्षेत्रे यांच्या विशेष शिफारशीनुसार त्यांची पाथर्डी तालुका कॉंग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृतनगर, संगमनेर येथील कारखान्याचे गेस्ट हाऊस याठिकाणी संपन्न झाला.यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात काँग्रेस कमेटी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदांच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी पाथर्डी तालुक्यातुन् डॉ. जमशीद सय्यद यांना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,डॉ सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मनोज राका यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष डॉ.दादासाहेब थोरात,पाथर्डी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष नासिर शेख , करंजी पंचायत समिती मंडळ गण अध्यक्ष संपतरावं क्षेत्रे, साखर कारखाना संचालक डॉ.तुषार दिघे,जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आदी मान्यवारांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मनोज राका यांनी डॉक्टर सेल चे कार्य हे काय असते ते समजावून सांगितले.या कार्यक्रमास राजेंद्र कानवडे, भागवत विर , मिलिंद कानवडे , दादा घुले , सुरेश झावरे , बाळासाहेब आढाव , प्रशांत भागवत, राहुल झावरे , डॉ. निलम पाटणी, नासिक जिल्हाध्यक्ष डॉ.गुलाब शेख , डॉ. सचिन चौधरी , डॉ. सचिन काळे,  डॉ. अरुण बोंबले , डॉ. सुजित तांबे,  डॉ.सचिन जाधव, डॉ. सोपान कर्डीले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.