अर्जुनी मोरगाव – महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहित तंत्रज्ञान आणि वाणिज्य विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना गुंतवणूक, बचत यांचे महत्व समजावे या करिता करियर कट्टा अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एस डांगे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रफुल नवखरे डॉ. एस.बी.बोरकर, प्रा. नंदेश्वर आणि कार्यक्रमाचे सयोजक डॉ.नितीन विलायतकर उपस्थिती होते.
यावेळी डॉ. सतीश बोरकर यांनी आर्थिक साक्षरता या बद्दल सविस्तर माहिती आणि कार्यशाळेची उपयुक्तता यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पी.एस. डांगे यांनी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिकवा यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे असे या बद्दल मार्गदर्शन केले. या कर्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रफुल्ल नवखरे यांनी आर्थिक साक्षरता, बचत खाते, मुदत ठेव, अवर्त ठेव, तसेच गुंतवणूकी बद्दल सोबतच शेअर मार्केट, डिमॅट खाते व व्यापार खाते यांसारख्या विषयांवर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी हजर होते व त्यांनी वरील सर्व माहिती चे प्रात्यक्षिक करून बघितले.या कार्यक्रमाचे संचालन मानसी नेवारे हिने केले.सदर कार्यक्रम हा करियर संसदेतील पदाधिकारी यांच्या नियोजनातून पर पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. शरद मेश्राम, प्रा शेखर राखडे, प्रा.यात्रिक भगत, प्रा. स्वाती मडावी यांनी परिश्रम घेतले.