■ भाजपचे
देवरी,ता.०३: भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. येशुलाल उपराडे यांनी भाजप टांसपोर्ट सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी देवरी तालुका भाजपचे कार्यकर्ता तथा टांसपोर्ट क्षेत्रातील नामांकित व्यक्ती प्रवीण देवानंद मेश्राम यांची निवड केली आहे. हि निवड प्रवीण मेश्राम यांनी टांसपोर्ट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून केलेली आहे.
या निवडीचे नियुक्तीपत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. येसुलाल उपराडे यांनी प्रवीण मेश्राम यांना सोमवार रोजी वितरीत केले.
या प्रसंगी अनिल येरणे, आफताब शेख, इंदरजीतसिंग भाटिया, गोंदियाचे केलनका आदि प्रामुख्याने उपस्थीत होते. प्रवीण मेश्राम यांनी या निवडीबद्दल पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आभार मानले आहे. यांच्या निवडीबद्दल गोंदिया जिल्ह्यासह देवरी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी अभिनंदन केले आहे.