कंत्राटी भरतीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना ओबीसी संघर्ष कृती समितीचे निवेदन

0
14

गोंंदिया,दि.03:- कंत्राटी शासन भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आज 3 आक्टोंबरला ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने कंत्राटी भरती विरोधात मुख्यमंत्र्याच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फेत भरती रद्द करण्यासंदर्भातील निवेदन सादर पाठविण्यात आले. शासनाचे कंत्राटी पदभारतीचा शासन निर्णय काढल्यावर बेरोजगार युवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.राज्यात 75 हजार जागा कंत्राटी भरतीने भरण्याचा निर्णय घेऊन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.ओबीसी बहुजन मंत्रालयासह वैद्यकीय विभागातही या जागा भरण्यासोबतच आता तहसिलदार सारखे पदंही कंत्राटी पधद्तीनेे भरण्याचा राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाचा निवेदनात निषेध नोंदवण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,अमर वराडे,रुपेश कुुथे,सुधीर गायधने,संदिप गाढवे,पिंटू बनकर,बबलू ढोमणे,करण टेकाम,शेखर वाळवे,संजु बहेकार,कशीश चंद्रिकापूरे,कमलबापू बहेकार,तुफानसिंह यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.