आमदार अपात्रतेबाबत अत्यंत मोठी अपडेट समोर !

0
15

मुंबई – शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर शिवसेनेतील आमदार आपत्रतेबाबत  कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आता ही सुनावणी संपली असून लवकर याचा निकाल दिला जाणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात आमदार अपात्रतेचा निकाल कधी लागणार? याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा (Mla Disqualification) निकाल 10 जानेवारी 2024 रोजी दिला जाणार असल्याचं कळतंय. शिवसेना आमदार अपात्रतच्या प्रकरणावर 10 जानेवारी 2024 रोजी निकाल घोषित करणार आहेत. आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, हे देशासाठी उदाहरण असेल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार असून विधानसभा अध्यक्षांनी ही निकालाचा मसुदा दिल्लीला कायदेशीर अभिप्रायासाठी तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती देखील समोर आली आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी 7 जानेवारी 2024 वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण ठाकरेंच्या बाजून निकाल लागला तर या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकते. त्यामुळे येत्या 10 जानेवारीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार की जाणार? हे कळेल.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीपर्यंत वाट न पाहाता, आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात.