म्हसवानी येथे रोहयो काम सुरू* ‌ ‌ *जो कामावर असेल त्यांचे हवे छायाचित्र,तेच कामावर

0
5

सडक अर्जुनी:–तालुक्यातील म्हसवानी ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो चे पादन रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आली. रोहयो योजनेंतर्गत कामे सुरू झाल्याने अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे.सदर पांदन रस्त्याचे काम मोतीराम भोयर ते प्रकाश राहांगडाले यांचे शेतात जाणा-या रस्त्याचे बांधकाम सुरु झाले.बहुतेक ठिकाणी खरीप हंगामातील शेतीचे काम संपल्यानंतर परप्रातांत मजूर कामासाठी स्थलातंरीत होतात.पण स्थानिक पातळीवर गावातच मजुरांना रोहयो चे काम सुरू झाल्याने मजुरांना गावातच मजुरी मिळत असल्याने बाहेर जाणे थांबले आहे.असेच जर संपूर्ण तालुक्यात गावागावात शासनाने रोहयो चे कामे सुरू केल्यास तालुक्यातील मजुरांना परप्रातांत कामासाठी भटकंती करावी लागणार नाही.म्हसवानी गावात १७ डिसेंबर २०२३ ला जि.प.सदस्य भुमेश्वर पटले व पं.स.उपसभापती शालींदर कापगते व म्हसवानीचे सरपंच प्रकाश राहांगडाले यांचे उपस्थित कुदळ मारून रोहयोचे कामाची सुरुवात करण्यात आली.त्याप्रसंगी ग्रा.प.सदस्य वनिता राऊत,दिपाली मार्हुले,संगिता उरकुडे,वनिता लटके,विदेश मार्हुले,राजकुमार शेंडे,विजू अंबादे,ज्योती राहांगडाले,निताराम भोयर,तांत्रिक सहायक सचिन मेश्राम,रोजगार सेवक युवराज मानकर यांची उपस्थिती होती.या कामावर पहिल्या दिवशी १०५ मजूर कामावर होते.त्यामध्ये ७५ महिला व ३५ पुरूष कामावर होते.रोहयो चे कामावर येणा-या मजुरांना नमुना-८ बंधनकारक करण्यात आले असून कामावर असतांनीज्ञमजुरांचे लाईव छायाचित्र नोंदणी दरम्यान अॅपलोड करणे बंधनकारक झाल्याने हजेरी लावून काम न करता जाणा-या मजुरांची ताराबंळ उडाली.रोहयो कामावर जो कामावर असेल त्यांचे छायाचित्र ,तेच कामावर असे ब्रिदवाक्य असल्याने कामावरून पळवाटा काढणा-या मजुरांची ताराबंळ उडाली आहे.