0
4

*याभागात महिलांकरिता एखादा गृहउद्योग खेचून आनण्यासाठी प्रयत्न करणार.*
====================
■आमदार सहषराम कोरोटे यांचे प्रतिपादन.
■देवरी येथे कांग्रेस पक्षाकडून सामुहिक हळदीकुंकू व महिला मेळाव्याचे आयोजन.
—————————–
देवरी,दि.२३: २०१९ मध्ये आपल्या आशिर्वादाने मी आमदार झालो. मी विधानभवनात पोहचल्यानंतर आपल्या भागातील समस्या व अडचणी विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वाचा अशाच आशिर्वाद माझ्यावर राहू दया. या भागातील माता भगिनी महिलांच्या आणि उमेदच्या, माविमच्या किंवा इतर महिला मंडळाच्या महिलांच्या हाताला काम मिळायला पाहिजे. त्यांना आपल्या पायावर उभे राहता आले पाहिजे. याकरिता या भागात महिलांकरिता एखादा गृहउद्योग खेचून आनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी येथे जिल्हा परिषदच्या क्रिडा संकुलनात रविवार (दि.२१ जानेवारी ) रोजी कांग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्ता सिमा कोरोटे यांच्यातर्फे मकरसंक्रांती निमित्य आयोजीत सामुहिक हळदी कुंकू – वाण वाटप व महिला मेळाव्यात उद्घाटक च्या रूपात बोलत होते.
या हळदी-कुंकू- वाण वाटप व महिला मेळाव्याचे उद्घाटन आमदार कोरोटे यांच्या हस्ते आणि जि.प.सदस्य उषा शहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी जि.प.सदस्य राधिका धरमगुडे, कार्यक्रमाचे आयोजक महिला कांग्रेस कार्यकर्ता सीमा सहषरामजी कोरोटे, जि.प..सदस्य संदिप भाटिया, उषा मेंढे, वंदना काळे, पं.स.सदस्य विमल कटरे, विना कटरे देवरी तालुका महिला अध्यक्ष सुनंदा बहेकार, देवरी शहराध्यक्ष मिना राऊत, आमगावं शहराध्यक्ष प्रभाताई उपराडे, महिला व बालकल्याणच्या माजी सभापती लता दोनोडे, माजी जि.प.सदस्य माधुरी कुंभरे माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार,कांग्रेसचे देवरी शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, पं.स.सदस्य अनुसया सलामे,भारती सलामे, नगरसेविका सुनीता शाहू व महिला सत्कार मुर्ती ए.पी.आय. मुळे मँडम,लक्ष्मी डोये, सरपंच मंदा चंदेल, ठाणेदार डांगे यांच्या धर्मपत्नी डांगे मँडम,लांडेकर मँडम,डॉ. श्रीपात्रे मँडम, चिचगडच्या ग्रा.प.सदस्य साईन सय्यद व या कार्यक्रमाचे संयोजक कांग्रेसचे वरिषठ कार्यकर्ता बळीराम कोटवार,विधानसभेचे युवक कांग्रेस अध्यक्ष दिपक(राजा) कोरोटे,नगरसेवक शकील कुरेशी यांच्यासह देवरी तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच, आशा वर्कर, बचत गटाचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी महिला सत्कारमुर्ती ए.पी.आय. मुळे मँडम,लक्ष्मी डोये, सरपंच मंदा चंदेल, ठाणेदार डांगे यांच्या धर्मपत्नी डांगे मँडम,लांडेकर मँडम,डॉ. श्रीपात्रे मँडम, चिचगडच्या ग्रा.प.सदस्य साईन सय्यद यांचा आमदार व महिला पदाधिका-यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देवून जाहिर सत्कार करण्यात आले. या दरम्यान शालेय विद्यार्थीनींनी आणि महिलांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करूण उपस्थितांचे वाहवाही लुटले.
पुढे बोलतांनी आमदार कोरोटे म्हणाले की, सरकार महिलांना एस.टी.बस मध्ये ५० टक्के सवलत दिले आहे. फक्त १५ टक्के महिलांना याचा लाभ घेत आहेत आणि जिवनावश्यक वस्तूचे दर गगनात भिडवून महिला गृहिणीचे आर्थिक शोषन करीत आहेत.मध्यप्रदेश,छत्तीसगड व राजस्थानातील पार पडलेल्या निवडणूकीत महिलांना चारसे ते पाचसे रूपयात घरगुती गँस देऊ असे आमीष दाखवून मत घेवून सत्तेवर आले. सत्तेवर आल्यावर मग बारासे रूपयात गँस देत आहे ही एक शोकांकीता आहे. अशा धोकेबाज भाजप पासून सावध राहिले पाहिजे. आपण घाबरू नका कांग्रेस पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.तसेच शहरी भागातील घरकुल लाभार्थ्याना अडीच लक्ष रूपये मिळते त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ही अडीच लक्ष रूपये मिळायला पाहिजे अशी मागणी या मेळाव्याच्या माध्यमातून मी करतो. असे ही कोरोटे म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक जि.प.सदस्य उषा शहारे यांनी तर संचालन तालुकाध्यक्ष सुनंदा बहेकार यांनी केले.आणि उपस्थितांचे आभार सिमा कोरोटे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सुभद्रा अगडे,अनवंता आचले, छाया मडावी, तारा टेंभूरकर, उज्वल कोचे,सुषमा वैद्ये, किरण राऊत, निर्मला मडावी, अविनाश टेभंरे, कुलदिप गुप्ता,अमित तरजुले, प्रशांत कोटागंले, प्रमोद मोहबीया, सचिन मेळे, कैलाश घासले, जयपाल प्रधान, नरेश राऊत,कलीराम कीरसान, छगनलाल मुंगनकर, अरविंद उके, विपिन कावळे,भीमराव नंदेश्वर, संदीप मोहबीया, कमलेश पालीवाल आदींनी सहकार्य केले.