ध्वजारोहणाच्या यादीतून राज्यसरकारने मंत्री छगण भुजबळांना डावलले

0
26

मुंबई, दि. २५: भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित करण्यात आले.सोबतच विविध जिल्ह्यात ध्वजारोहणाकरीता विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पुढील प्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, मंत्री ध्वजारोहण करतील असे कळविण्यात आले.त्या यादीतून राज्याचे अन्न नागरी पुुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगण भुजबळांना डावलल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांनी तर आपल्या एक्स हॅंडलवरुन राज्यातील सरकारच ओबीसी विरोधी असल्याचे सिद्द झाल्याचे म्हटले आहे.

(अनुक्रमे मा. पालकमंत्री, मा. मंत्री यांचे नाव आणि ध्वजारोहण करण्यात येणाऱ्या जिल्ह्याचे नाव या क्रमाने). देवेंद्र फडणवीस- नागपूर, अजित पवार- पुणे, राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, दिलीपराव वळसे पाटील- बुलढाणा, डॉ. विजयकुमार गावित- भंडारा, हसन मुश्रीफ- कोल्हापूर, अब्दुल सत्तार- हिंगोली, चंद्रकांत पाटील- सोलापूर, गिरीश महाजन- धुळे, सुरेश खाडे- सांगली, तानाजी सावंत- धाराशीव, उदय सामंत- रत्नागिरी, दादाजी भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, गुलाबराव पाटील- जळगाव, संदिपान भुमरे- छत्रपती संभाजीनगर, धनंजय मुंडे- बीड, रवींद्र चव्हाण- सिंधुदुर्ग, अतुल सावे- जालना, शंभूराज देसाई- सातारा, मंगल प्रभात लोढा- मुंबई उपनगर, धर्मरावबाबा आत्राम- गोंदिया, संजय बनसोडे- लातूर, अनिल पाटील- नंदुरबार, दीपक केसरकर- ठाणे, आदिती तटकरे- रायगड.