गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदारांना “पोलीस शौर्य पदक व 01“गुणवत्तापुर्ण सेवा पदक”जाहीर

0
9

गडचिरोली,दि.25ः देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट व शौर्यपुर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज 25 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” व 01 “गुणवत्तापुर्ण सेवासाठी पदक” जाहीर झाले आहे.

संपूर्ण देशभरात एकुण 275 पोलीस शौर्य पदक व 753 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 18 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेत,ही गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे.सन 2023 या वर्षामध्ये 62 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. सन 2024 मध्ये एकुण 19 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार-1) सोमय विनायक मुंढे, भा.पो.से. पोलीस अधीक्षक लातुर, 2)संकेत सतीश गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करवीर जि. कोल्हापुर, 3) पोहवा/3078 मोहन लच्छु उसेंडी, 4) पोहवा/873 देवेंद्र पुरोषत्तम आत्राम (2ND BAR to PMG,)), 5) पोहवा/2734 जीवन बुधाजी नरोटे, 6) पोहवा/2612 माधव कोरके मडावी, 7) पोहवा/2474 संजय वत्ते वाचामी (1ST BAR to PMG,) 8) पोहवा/3029 मुंशी मासा मडावी 9) पोहवा/3047 गुरुदेव महारुराम धुर्वे, 10) पोनाअं/3729 कमलेश निखेल नैताम, 11) पोनाअं/3743 शंकर पोचम बाचलवार, 12) पोनाअं/3026 विनोद मोतीराम मडावी, 13) पोनाअं/4136 दुर्गेश देविदास मेश्राम, 14) पोअं/3718 विजय बाबुराव वडेट्टीवार, 15) पोअं/5488 कैलाश श्रवण गेडाम, 16) पोअं/4497 हिराजी पिताबंर नेवारे, 17) पोअं/5697 ज्योतीराम बापु वेलादी, 18) पोअं/1156 सुरज देवीदास चुधरी यांना पदक मिळाले असुन 01) सहा.फौ/3248 देवाजी कोट्टु कोवासे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.
वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असुन, त्याबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम.रमेश या सर्वांनी त्यांचे कौतुककरीत शुभेच्छा दिल्या आहेत.