पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

0
8

अर्जुनी मोर.-मोदी सरकारचा कालखंड सुवर्ण युग गणला जाईल.देशातील शेवटच्या टोकावरील सर्वसामान्य व्यक्ती हा विकासाचा केंद्र मानून सरकार विविध कल्याणकारी योजना राबवीत आहे. भविष्यात या देशाची सूत्रे नारी सक्तीच्या हातात जातील. महिला आरक्षण विधेयकामुळे देशातील सर्वसामान्य महिला आता आमदार,खासदार बनेल. या विधेयकामुळे राजकीय क्षेत्रातील महिलांचा वाटा वाढला.महिला बचत गटांच्या माध्यमातून नारीशक्ती उदयास आली.मोदींनी महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी 5 000 कोटी ची भगवान बिरसा मुंडा योजना आणली.देशाच्या चौफर विकास आणि जगात डंका वाजतो आहे.अयोध्येत श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्टा सोहळा साजरा झाला आणि संपूर्ण देश राममय झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश येशोशिखर गाठत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
ते येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. पंचायत समिती सभापती सविता कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात आ. मनोहर चंद्रिकापुरे,जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी अनिल पाटील,उपसभापती होमराज पुस्तोडे,राकांपा महासचिव गंगाधर परशुरामकर,जि.प. उपाध्यक्ष यशवंतराव गणवीर,उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शाहारे,तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,जि.प. सदस्य लायकराम भेंडारकर,कविता कापगते,श्रीकांत घाटबांधे,जयश्री देशमुख, पौर्णिमा ढेंगे,पस सदस्य नूतनलाल सोनवाणे,डॉ.नाजूक संदिप कापगते, लोकपाल गहाणे, कुंभरे,दुर्योधन मैद,नगरसेवक दाणेश साखरे,राकेश जयस्वाल,माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे उपस्थित होते.
यावेळी आ. चंद्रिकापुरे यांनी, माजी मंत्री बडोले यांनी भूमिपूजन केले ,मी लोकार्पण करतोय.रोजगार हमी योजना 172 योजनांची जननी आहे.या योजनेने गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.गोंदिया जिल्हा या योजनेत महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे.नव्या इमारतीमध्ये नव्या ऊर्जेने काम करा.लवकरच अर्जुनी येथे उपजिल्हा रुग्णालय आणि केशोरीला ग्रामीण रुग्णालय होईल.शासन,प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वय साधून विकासाची गंगा आणण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी बीडिओ विलास निमजे,संचालन विस्तार अधिकारी डी.डी.लंजे आणि आभार विस्तार अधिकारी अनिल चव्हाण यांनी केले.