= प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अभिनेत्री निशिगंधा वाड व आ.प्रणिती शिंदे करणार मार्गदर्शन
अर्जुनी मोर.:– समाजाची प्रगती करायची असेल तर महिलांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. आपण स्त्रीला जगतजणी म्हणतो मात्र मातृशक्तीला शसक्त करण्याची गरज आहे यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांतील सडक अर्जुनी गोरेगाव तसेच अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता.०४) रोजी स्थानिक सरस्वती महाविद्यालयात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड तर आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे सोलापूर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते महिला मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी विशेष अतिथी आमदार अभिजीत वंजारी आमदार सहसराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, पी. जी. कटरे अमर वऱ्हाडे, डॉ.चंद्रकांत निंबार्ते,सौ.वंदना काळे, भागवत नाकाडे,माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, राजु पालीवाल, झामशिंग बघेले, प्रमोद पाऊलझगडे, कृष्णा शहारे, चंद्रकला ठवरे, सौ.शिला उईके, इत्यादींच्या विशेष उपस्थितीत आयोजित महिला मेळाव्याचे उद्घाटन पार करणार आहे. आयोजित महिला मेळाव्याला तीनही तालुक्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी तथा समस्त जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या महिला मेळाव्याचे आयोजक कृऊबा उपसभापती अनिल सुखदेव दहिवले व प्रा. नूतन अनिल दहिवले तथा समस्त मित्रपरिवार तालुका काँग्रेस कमिटी अर्जुन मोरगाव महिला काँग्रेस कमिटी तथा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
‘शिक्षणामुळे आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असली तरी, आजही मोजक्याच स्त्रियांना निणर्यस्वातंत्र्य आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांचा बरोबरीने वाटा असायला पाहिजे, त्या शिवाय प्रगती नाही महिलांना संघटित करणे गरजेचे आहे यासाठी महिला मेळाव्याचा आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन प्रा.नूतन अनिल दहिवले यांनी केले आहे.