धाराशिव : राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय शोषित, पिडीत, वंचित, दलित वर्गाचे कल्याण साधले जाणार नाही. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची सत्तेची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय व स्वतः राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. म्हणूनच ‘आपलीच मते, आपलाच पक्ष, आपलाच नेता आणि आपलीच सत्ता’ आणावयाची असेल, तर देशातील व राज्यातील या वर्गाला राजकीयदृष्ट्या संघटीत करण्याची व राजकीय सत्ता काबिज करण्याची गरज आहे, असे सांगत प्रकाश अण्णा शेडगे यांनी ‘ओबीसी बहुजन पार्टी’ ची स्थापना केली. तुतारी वाजविणारा पुरुष हे चिन्ह प्राथमिक स्तरावर पार्टीला मिळणार आहे. लोकसभाच्या ४८ जागा आम्ही लढवणार आहोत, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, माढा, बीड, सांगली इतर मतदार संघात उमेदवार ठरले आहेत. आमची लढाई कोणत्याही रंगाशी, झेंड्याशी नसून, माणुसकीची लढाई आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दि.१५ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख सचिन शेंडगे यांनी यावेळी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणून सचिन शेंडगे काम करत आहेत व ओबीसी बहुजन पार्टीच्या जिल्हात पदाधिकारी निवड करण्यात आल्या आहेत. या मध्ये जिल्हा संघटक मछिंद्र सारूक , कळंब तालुकाप्रमुख गोविंद जाधवर , धाराशिव शहरप्रमुख प्रकाश उर्फ प्रेम दुर्गाप्पा पवार , वाशी तालुकाप्रमुख म्हणुन नांदगावचे सरपंच उमाकांत सानप यांची निवड धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली आहे. लोकसभेच्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना देखील उपस्थित कार्यकर्त्यांना सचिन शेंडगे यांनी दिले आहेत. यावेळी यावेळी जिल्हाप्रमुख सचिन शेंडगे , मा. नगरसेवक दुर्गाप्पा पवार , उमेश मोराळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते करते यावेळी उपस्थित होते.