भाजपा प्रदेश ओबीसी सचिव पदी चामेश्वर गाहाणे यांची नियुक्ती

0
5

अर्जुनी मोर. – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव पदी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध येथील भाजपाचे जेष्ठ नेते चामेश्वर दुधराम गहाणे यांची नियुक्ती १३ मार्च २०२४ च्या पत्रान्ववे करण्यात आली.
ही निवड भाजपाचे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी केली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याचे संघटन वाढवावे तथा ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी भाजपमध्ये सामील करण्यासाठी आपण पथक परिश्रम करावे असेही नियुक्ती पत्रात म्हटले आहे. चामेश्वर गहाणे यांची भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव पदी निवड झाल्याबद्दल गोंदिया जिल्हा भाजपा व अर्जुनी मोरगाव तालुका भाजपच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.