गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र भाजपकडेच!

0
11

– उमेदवार खा.अशोक नेते की मिलिंद नरोटे?

 गडचिरोली  : महायुतीमध्ये गडचिरोली- चिमूर  लोकसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सोडण्याची जोरदार मागणी राका तर्फे झाली होती. मात्र काल दिल्ली येथे भाजपच्या झालेल्या बैठकीमध्ये गडचिरोली -चिमूर  या लोकसभा क्षेत्रातून भाजपचाच उमदेवारच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपातर्फे उमेदवारी नेमकी खा. अशोक नेते यांना की डॉ. मिलिंद नरोटे यांना मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.