वाळू वाहतूक तक्रारीत विनापरवानगी नाव वापरणार्यावर कारवाई करा

0
16

गोंदिया,दि.24ः तालुक्यातील डांगोरर्ली येथील वाळू घाटावरुन अवैधरित्या वाळूचा साठा करुन त्या वाळूची वाहतूक करुन शासनाच्या लाखो रुपयाच्या महसूल बुडविला जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना करण्यात आली होती.मात्र ती तक्रार ज्यांच्या नावे करण्यात आली,त्या नागरिकांनीच आता आमच्या त्या तक्रारीशी संबध नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांकडे आमच्या नावाचा वापर करुन खोटी तक्रार करणार्याविरुध्द कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्याची तयारी डांगोर्ली येथील राजेश्वरी कावरे,भुजलबाई जमरे,सुनीता माने,खुमनबाई बिजेवार,लिखीराम माने,अनिल बाहे,सुधीर बिजेवार,मुरलीधर डोहरे,विष्णु बिजेवार व रामकुमार कावरे यांनी केल्याची माहिती दिली आहे. शासनाने येथील वाळू घाट लिलाव केले असून त्या वाळूघाटातील वाळूचा उपसा करुन शासनाने ठरवून दिलेल्या जागेवर गोळा करण्यात येत आहे.मात्र व्यवसायिक स्पर्धेत आपल्याला वाळूची चोरी करायला संधी मिळत नसल्याचा राग मनात घेऊन कुणीतरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.मात्र त्या तक्रारीत ज्या महिला व पुरुषांची नावे आहेत,त्यांनी मात्र आम्हाला न विचारताच आमची नावे कुणी टाकली असा प्रश्न उपस्थित केल्याने हे प्रकरण विनापरवानगीने महिला पुरुषांची नावे टाकणार्याच्या अंगलट येणार असल्याचे दिसून येत आहे.