गुरूदास कामतांचा राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे

0
8

मुंबई, दि. २३ – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते असलेल्या कामत यांनी दोन आठवड्यांपूर्वी वैयक्तिक कारण देत कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती.
मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, त्यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला पण कामत त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली व अखेर आज त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला असून ते गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या प्रभारीपदी कायम राहणार आहेत.