भाजपाची जिल्हा बैठक २४ जून रोजी

0
13

गोंदिया : भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक २४ जून रोजी दुपारी १२ वाजता अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना लॉनमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, खा. अशोक नेते, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व माजी खासदार व आमदार, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, सर्व आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, सर्व जि.प. व पं.स.पदाधिकारी व सदस्य, नगर परिषद व नगर पंचायतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, भाउराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.