26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home राजकीय उबाठा शिवसेनेने जाळला गृहमंत्री शाहचा पुतळा

उबाठा शिवसेनेने जाळला गृहमंत्री शाहचा पुतळा

0
251

गोंदिया : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात अभद्र टिपणी करत  औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष  असल्याचे केलेल्या अभद्र वक्तव्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांची मने दुखावली गेल्याने त्यांच्या विरोधात आज दि. २२/०७/२०२४ रोजी गोंदिया जिल्हा शिवसेनेने गृहमंत्री अमित शाह यांच्या पुतळा जाडून विरोध प्रदर्शन केले. तसेच गृहमंत्री विरोधात नारेबाजी बोलून त्यांनी केलेल्या वक्तव्यबद्दल माफी मागावी अशीही मागणी शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) चे गोंदिया जिल्ह्यातील सर्व पदाधिका-यांनी केली आहे.

या दरम्यान जिला प्रमुख पंकज एस यादव, राजेश कनौजिया शहर प्रमुख, अशोक आरखेल, संजू शमशेरे तालुका समन्वयक, सुनिल रोकड़े विधानसभा समन्वयक, हरिश तुलस्कर युवासेना जिला अधिकारी, विक्की बोमचर उपजिला अधिकारी, राहुल ठाकुर युवासेना शहर अधिकारी, गंगाधर शुलाखे उप तालुका प्रमुख, इत्यादि कार्यकर्त्ता तसेच पदाधिकारी उपस्थित होते.