भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंंघातील ३ जागावर आमचा दावा-माजी गृहमत्री अनिल देशमुख
गोंदिया– आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली असून गोंदियात देखील राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा व भंडारा जिल्ह्यातील तुमसर या तिन्ही जागेवर आमचा दावा असून या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढणार असल्याचे सांगितले.येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा व आपला पक्षाला उमदेवार कशापध्दतीने निवडून येईल यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची गाव्ही कार्यकर्त्यांना दिली. यावेळी माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार दिनानाथ पडोळे,प्रदेश महामंत्री दिलीप पनकुले,प्रदेश उपाध्यक्ष व प्रभारी बजरंगसिह परिहार,रविकांत बोपचे,गोंदिया जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे,मिथून मेश्राम उपस्थित होते.
धर्मरावबाबांच्या विरोधात त्यांची कन्याच लढविणार निवडणूक-अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट .
गोंदिया- शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया जिल्हा मेळाव्यानंतर पत्रकारपरिषदेत बोलतांना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधात निवडणूक लढविणार असा खळबजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे. “धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवारांना तीन वेळेस भेटली आणि माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही अशी ती म्हणाली.” अशीही खळळजनक माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.तर धर्मरावबाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतात तो काही दिवसातच उतरणार असाही खोचक टोला यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला.