प्रफुल्ल पटेल आपसे यह उम्मीद तो नही थी…खासदार अमोल कोल्हे

0
461

मविआ सरकारला महाराष्ट्रातून हाकला तर दिल्ली ही त्यांच्या हातून गेलीच समझा: जयंत पाटील

तिरोड्यात शिवस्वराज्य यात्रेचे जंगी स्वागत

तिरोडा,दि.११:- एका सर्वेतून यांना असं लक्षात आलं आहे की या गुलाबी जॅकेट वाल्यांना फक्त  नऊ ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील ३० आमदारांचे भवितव्य धोक्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यात विमानतळ आलं पण विमानाचा पत्ता नाही आणि भेल मध्ये नेमकं काय खेल झालं हे आता आम्हालाही कडून चुकलं आहे स्वतःची ईडीची नोटीस घालावी म्हणून त्यांनी भेल मुळे स्थानिकांना मिळणारा रोजगार डावलून स्वतःची कातडी वाचवली. प्रफुल्ल पटेल आपसे यह उम्मीद तो नही थी…
चाय पर सुरू हुई ये सरकार, गाय पर आकर अटक गई, १५ लाख की बात हुई थी १५ सौ पर कैसे अटक गई.. भाई ,दादा,भाऊ यह गुलाबी धूल हमारी आखो मे अब नही झोंके.. अशी शेरोशायरी करत खासदार अमोल कोल्हे यांनी ही सभा गाजवली.ते शिव स्वराज्य यात्रेला तिरोडा येथे संबोधित करीत होते.

भारतीय जनता पक्षाला देशाच्या सत्तेतून हाकलून लावण्या याकरिता आपण जनतेने लोकसभेत त्यांना २४० पर्यंत थांबवलेही पण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार मुळे ते कसेबसे बचावले आहेत यांची दिल्लीची सत्ता घालवायची असेल तर महाराष्ट्रातून या भाजप प्रणित सरकारला घालवा म्हणजे देशातील सत्ताही गेली समजा असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ते मंगळवार १० सप्टेंबर रोजी तिरोडा येथे शिवस्वराज्य यात्रा निमित्त जनतेला संबोधित करतांनी बोलत होते.

दिप प्रज्वलन आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, मधुकर कुकडे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, मेहबूब शेख, रमेश बंग, दिलीप पणकुले, रविकांत बोपचे, बाबा बैस, बजरंग परिहार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा डोंगरवार आदि उपस्थित होते. पुढे जयंत पाटील म्हणाले की गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात यांची सत्ता आहे त्यांना बदलण्याची गरज आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
तिरोड्यातील अदानी विद्युत निर्मिती प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही, तिरोडा येथील भाजप आमदाराच्या कुटुंबीयांची जागृती पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याच्या येथील ६००० कुटुंबांना फटका बसला आहे. ज्यांनी यात आपले घामाचे पैसे गुंतवलेले  त्यांना परत दिले गेले नाही सरकार कडे सहकार खाता असून सुद्धा जागृती पतसंस्थेच्या घोटाळ्याचा काय झाला हे आज सरकारला विचारणे गरजेचे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या पक्षाला फोडले याचा राग मराठी माणसाच्या मनात आहे आणि जनता आता आपल्या मतातून यांना उत्तर देणार आहे महाराष्ट्रासाठी हे स्वाभिमानाची लढाई आहे त्यामुळे फक्त पुढील दोन महिनेच या सरकारच्या कालखंड आहे यानंतर हे सरकार जाणारच आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे आता काळ्या दगडावरची रेघ झाली आहे. या सभेला संबोधित करताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की पुढील विधानसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडी ला कौल दिला तर आम्ही लाडकी बहिणींना तीन हजार रुपये महिना देऊ, गोंदिया भंडारा लोकसभेतून तुमसर, तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गट दावा करणार आहे.

भर पावसात ही ड्रीमलँड या सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल शिवस्वराज यात्रेचे आयोजक रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी तिरोड्यातील जनतेचे आभार मानले तसेच पुढील निवडणुकीत आपला असाच सहकार्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त केली. या सभेला माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे आणि मधुकर कुकडे यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन नासीर भाई यांनी तर आभार बिसेन मॅडम यांनी मानले.