अर्जुनी मोर- तालुक्यातील विहिरगांव/बर्ड्या येथील विविध पक्षांचे कार्यकर्ते व युवकांनी गोंदिया जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) उपाध्यक्ष दानेश साखरे यांचे मार्गदर्शनात ता.24 सप्टेंबरला प्रफुल पटेल, राजेंद्र जैन यांचे कार्यप्रणालीवर प्रभावीत होवुन राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटात प्रवेश केला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरु
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन महिण्यावर येवुन ठेपल्या आहेत. अनेक पक्षात उमेदवारांची प्रचंड रिघ लागली आहे. जो तो इच्छुक उमेदवार आपल्या फिल्डींग मधे लागलेला आहे. महायुतीमधे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटाला जाणार? अशा आशेने इच्छुक उमेदवार कामालाही लागले आहेत. अर्जुनी मोर. नगरपंचायत चे नगरसेवक तथा युवा सामाजीक कार्यकर्ते व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दानेश साखरे यांनी प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांचे सखोल मार्गदर्शनात अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र पिंजुन काढला आहे. गेल्या दोन वर्षापासुन त्यांनी या विधानसभा (Assembly) क्षेत्रातील गावंगाव पिंजुन काढुन राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटाची मोठी फळी निर्माण केली आहे. अनेक गावातील युवक वर्गांनी दानेश साखरे यांचे मार्गदर्शनात राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे प्रवेश करुन दानेश साखरे यांना आपला युवा नेता म्हणून निवडलेला असल्याचे दिसुन येत आहे. अशातच अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्रातील विहिरगांव बर्ड्या येथील शेकडो कार्यकर्त्यांनी दानेश साखरे यांचे मार्गदर्शनात राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे प्रवेश केला आहे.