अवैध दारू विक्रीचा समुळ बंदोबस्त व्हावा; दारूबंदीची मागणी

0
73

अर्जुनी मोर : तालुक्यातील बाक्टी येथे अवैध दारूविक्रीला ऊत आल्याने गावातील वातावरण बिघडत चालले आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून गावातील युवकांनी पुढाकार घेत दारूबंदीची मागणी केली. यासाठी पोलिस विभागाला निवेदन देण्यात आले. यानुरूप (ता.२५) येथे दारूबंदीसाठी (Illegal liquor Ban) ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला गावातील महिला-पुरूषांसह दारूविक्रेत्यांची उपस्थिती होती.

बाक्टी गावात सर्रास दारूविक्री सुरू आहे. (Illegal liquor Ban) दारूविक्रीमुळे गावातील ज्येष्ठ, तरूण दिवसेंदिवस दारूच्या आहारी जात आहेत. याचा परिणामी भावी पिढीवरही होत आहे. पोलिसांना न जुमानता विक्रेते दारूविक्री करीत आहेत. गावात मुबलक प्रमाणात व सहज दारू उपलब्ध होत असल्यामुळे अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जाताना दिसत आहेत. त्यामुळे गावात भांडण, तंट्याचे प्रमाण वाढत चालले आहे. निर्माण होणार्‍या तंट्यांनी गावातील कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत चालला आहे.

या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून गावातील युवकांनी (Illegal liquor Ban) अवैध दारू विक्रीचा समुळ बंदोबस्त व्हावा व गावात दारूबंदी व्हावी, यासाठी अर्जुनी मोरगावचे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांची भेट घेवून निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत ठाणेदार सोनटक्के व ग्राम पंचायत प्रशासनाने दारूबंदीसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार आज (ता.२५) बाक्टी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यासभेत महिला, पुरूषांसह दारू विक्रेत्यांची उपस्थिती होती.

दरम्यान दारूबंदीला घेवून साधकबाधक चर्चा करण्यात आली. यानंतर ठाणेदार सोनटक्के यांनी (Illegal liquor Ban) अवैध दारू विक्रेते तसेच व्यसनाधीशांना सूचना देऊन यापुढे गावात कुणीही दारूविक्री करू नये, दारू पिणार्‍यावर व अवैध मोहफुल विक्री करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करून तडीपार करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले. यावेळी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंचासह पदाधिकारी उपस्थित होते.