आसोली जि. प. राष्ट्रवादी काँग्रेस च्या सभेत कार्यकर्त्यांचा प्रतिसाद

0
83

गोंदिया,दि.०८:::राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया तालुका आसोली जि.प. क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ताची संघटनात्मक बैठक ग्राम मोरवाही येथे सुरेश कावळे यांच्या निवास स्थानी माजी आमदार  राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत त्यांनी नवरात्रीच्या पावन पर्वावर मां जगदंबा दुर्गाचा सर्व जनतेला आशीर्वाद लाभो व जीवन मंगलमय होवो अशी मनोकामना केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश व उत्साह असून कार्यकर्ता कुठेही कमी नाही ही बाब दाखविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकी यश मिळवायचे आहे. शेतकऱ्यांचे कैवारी, जनसामान्यांचा आधार, क्षेत्राच्या विकासासाठी एकमेव नेतृत्व खा. प्रफुल पटेल आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे सांगत माजी आमदार  राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यां मध्ये जोश भरला.

बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, कुंदनभाऊ कटारे, रविकुमार पटले, अखिलेश सेठ, संदिप मेश्राम, चुन्नीलाल सहारे, बिरजूलाताई भेलावे, शोभाताई गणवीर, भूमिका गड़पायले, सयाराम भेलावे, सुरेश कावळे, रामू चूटे, भाकरे जी, नितीन गणवीर, गणेश अगडे, मधोराव शिवणकर, नंदकिशोर ब्राम्हणकर, भूमेश्वर शेंडे, घनश्याम शिवणकर, शंकर करंजेकर, योगराज गौतम, गंगाराम कापसे, चैनलाल दमाहे, मनोहर पटले, जियालाल पटले, पुरण उके, डॉ फरकुंडे, धम्मादिप गणवीर, सयासराम उपवांशी, गणेश फुंडे, प्रेमलाल भांडारकर, सुरेंद्र रीनायित, अशोक ब्राह्मणकर, डॉ शिवणकर, बाळु शिवणकर, सेवकराम रीनाईत, राजू गायधने,सुनिल पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकुर, संतोष ठाकुर, ध्रुवदास ठाकुर, डूलिराम भाकरे, इंद्राराज शिवणकर, सुरेश चुटे, उमेश मुनेश्वर, फुलीचंद खवासे, रुपालाल खोटेले, भारत पंधराम, ग्यानिराम वंजारी, दिपक हूकरे, राजकुमार गणवीर, किशोर पारधी, आत्माराम ठाकुर, पप्पू टेंभरे, प्रेमलाल भांडारकर, गोपाल कुंभरे, सुकचंद भलावी, संजय मेश्राम, राजेश शिवणकर, जैयलाल मेंढे, रामेश्वर खोटेले, राधेश्याम मूनेश्वर, तुकाराम कोरे, शिवदत्त टेकाम, डूडीराम ठाकुर, राजू सतदेवे, विक्की भांडारकर, शैलेश मेंढे, छंनु हेमने, कमल ठकरेले, राजू चौहाण, गोपाल डोये, नीलकंठ हेमने, इनीलाल बिशेन, गुनिराम कावळे, श्यामराव कावळे, राजेश कावळे, बाबू लाल भांडारकर, राजेश शिवणकर, अनमोल ब्राह्मणकर सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.