भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर;विजय रहांगडाले,विनोद अग्रवाल व संजय पुराम यांचा समावेश

0
1117

तिरोड्यातून विद्यमान आमदार विजय रहागंडालेना तिसर्यांदा संधी

भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर

गोंदिया- भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.तसेच  कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूड चंद्रकात पाटील नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले आणि नाशिक पश्चिमतून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार विजय रहागंडालेंना तिसर्यांदी संधी देण्यात आली.तर गोंदिया विधानसभा मतदारसंघ अपक्ष आमदार विनोद अग्रवाल तसचे आमगाव मतदारसंघातून माजी आमदार संजय पुराम यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, धुळे शहरमधून अनुप अग्रवाल भोकरदानमधून संतोष दानवे, राम कदम आदींना उमेदवारी देण्यात आली आहे. बल्लारपूर येथून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.