
गोंदियात ड्रायपोर्ट मंजूर,लवकर होणार कामाला सुरवात
गोंदिया,दि.०८- सध्याच्या घडीला अनेक बांधकामाचे कंत्राट हे राजकीय नेतेच करु लागले असून नेतेच कंत्राटदार झाल्याने यांना कसे काळ्या यादीत टाकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राजकारणात कंत्राटदारीकरीता येऊ नये तर समाजकारण व राष्ट्रकारण करण्याकरीता यावे असे केंद्रिय रस्ते वाहतूक मंंत्री नितीन गडकरी म्हणाले.ते गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या जाहीर प्रचारसभेत बोलत होते.त्यांनी याआधी आमगाव येथेही भाजप महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहिर सभेला संबोधित केले.पुढे बोलतांना त्यांनी जातीच्या नावावर राजकारण करतांना चुक असल्याचे सांगत टिका केली.तसेच कुठल्याही परिस्थितीत संंविधान बदलणार नाही याची ग्वाही देत विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
गडकरी म्हणाले की, सदर निवडणूक ही गोंंदियाच्या विकासाचे व भाग्य घडविण्याची निवडणूक आहे.महाराष्ट्रातील गोंंदिया जिल्ह्यात ४० टक्के जंगल आहे.विदर्भात ७५ टक्के गौण खनिज आहे,पण त्या माध्यमातून विकास होऊ शकला नाही.वनसंपदा,व्याघ्रपर्यटन आपल्या शेजारी असूनही दुर्भाग्याने आपणाकडून जसे लक्ष द्यायला हवे होते,तसे न दिल्याने पर्यटन रोजगारातून विकास होऊ शकला नाही.पाणी,विज आणि रस्ते या सर्वांची गरज औद्योगिक व्यवसाय करण्यासाठी गरज असते.परंतु आपल्या विदर्भात ते आधी नसल्याने औद्योगिक विकास होऊ शकला नाही.आपण रस्ते मंत्री झाल्यावर दळणवळणाच्या सोयीवर लक्ष दिले.स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतर गावांना जोडणारे रस्ते तयार करण्याची योजना तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयींच्या काळात आली,ती म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होय.गावांना शहरांसोबत जोडून नवी क्रांती त्यांनी आणली.
पुढे बोलतांना गडकरी म्हणाले,गरीबांना त्यांच्या हक्क अधिकाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे.कपडा,रोटी व घर त्याला ज्या दिवशी मिळेल तो दिवस आपल्या कार्याचा चांगला दिवस राहील.येत्या दोन वर्षात आपल्याला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.तुम्हची सर्व कामे घरातूनच होणार आहेत.आज गावातील युवकांना रोजगार नाही.शेतकर्यांना त्यांच्या उत्पादित मालाला भाव नाही हे आम्हाला मान्य करावे लागेल.विकास कामाची इच्छाशक्त ठेवणारा व्यक्ती हवा.आपल्या घरच्या नातेवाईंकाना कंत्राटदारी मिळवून देणारा आमदार खासदार नको.गोंदियाला ड्रायपोर्ट मंजूर झालेला असून जागा मिळताच येत्या काही दिवसात ते सुरु होईल व गोंदियातूनच तांदळाचा व्यापार देशविदेशात होईल.नागझिरा नवेगााव सुंदर आहे,त्याचे योग्य मार्केटिंग केल्यास पर्यटकांच्या रांगा आपल्याकडे लागतील असेही म्हणाले.
यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल म्हणाले की सध्याच्या स्थितीत राजकारणाचा स्थर घसरत चालला असून आयाराम गयाराम यांच्यावरच सध्या राजकारण अवलंबून आहे.परंतु परिस्थितीनुसार परिवर्तन होत असते असे असतांना विरोधी पक्षाचे उमेदवार यांच्यामुळे मतदारसंघातील जनता अधिक त्रस्त झालेली होती,त्यामुळेच त्यांना मागच्या निवडणूकीत जनतेने पराभवाचा स्वाद चाखायला लावला.तोच स्वाद यावेळच्या निवडणूकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवाराला ७५ हजार मतांनी निवडूण आणावे.गेल्या २५ वर्ष सत्ता हातात राहूनही मतदारसंघाचा विकास करु शकले नाही.त्याच्यामुळे या मतदारसंघातील अनेक योजना पाण्याविणा ६०० कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आल्या,पण एक थेंब पाणी नाही.येथील नाट्यगृह की गाय म्हशींचा तबेला अशाप्रकारचे अनेक काम माजी आमदाराने केले.मात्र विनोद तुम्हालाही सांगतो तुम्ही असे कराल तर गाठ माझ्याशी आहे.गोंंदियाला बाकी लोकांनी घाेषणेतच नंबर केले.मात्र आपण काम करुन वास्तविक क्रमांक १ चे सर्वजण विकासाठी येऊन करु.माझ्या नावाच्या मागेही गोंंदिया लागलेला आहे.जेव्हा माझ्या गोंदियात स्वच्छतेचे वाभाळे निघाले,विकास नाही अशा परिस्थितीत मलाही मान शरमेने खाली घालावी लागते.या प्रचारसभेत आमदार परिणय फुके,माजी खासदार सुनिल मेंढे,माजी आमदार राजेंद्र जैन,उमेदवार विनोद अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले.संचालन दिपक कदम यांनी तर आभार यांनी मानले.