गोंंदिया,दि.०८-जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जाहिर सभा पार पडली.या जाहिर सभेत बोलतांना गडकरी यांनी संविधान कुठल्याही स्थितीत आमचे सरकार बदलणार नसल्याचे सांगत आधीच्या निवडणूकात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये लढाई व्हायची.आता आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आल्याने उरलेला जो पक्ष या निवडणूकीच्या रिंगणात उतरलेला आहे.त्यांच्या हातात घंटा….उरलाय अशा उपरोधिक टोला हाणला.
गडकरी यांनी जाहिर सभेत परत जातीच्या नावावर राजकारण करणार्यांच्या विरोध करीत आम्ही संघाच्या विचारसरणीवर चालणारे असल्याचे सांगतिले.तसेच जात की बात करनेवालो को लाथ मारुंगा असे म्हणून ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीचा जाहिर विरोध करीत त्यांना एकप्रकारे संघाच्या विचारसरणीला महत्व देत ओबीसींची जातनिहाय जनगणना नाकारली आहे.