बडोले यांचे प्रचारार्थ नवेगावबांध येथे सभा
अर्जुनी मोर.— स्रि स्वातंत्र्याची लढाई लढुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना समानतेचा अधिकार दिला.शिक्षणाचे दालन उघडुन दिले.स्रियांना मतदानाचा अधिकार दिला.संविधानातुन स्रियांचे हक्क आणी अधिकार मिळवुन दिले.त्याच संविधानामुळे आज केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिला भगिणींसाठी विवीध योजना राबवुन त्यांचे आयुष्यात आमुलाग्र बदल घडवुन आणला.त्यामुळे महिला आता आत्मनिर्भर बनल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारनी स्रियांच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी विवीध योजनेच्या माध्यमातून त्यांना मजबुत करण्याचे काम केले.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिड हजार रुपये महिण्याचे अर्थसहाय्य सुरु केले.त्यामुळे महायुती सरकार हे आपले सख्येभाऊ झाले.आणी हे काॅग्रेसवाले आपले सावत्रभाऊ लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले.अशा सावत्रभावांना धडा शिकविण्याची वेळ ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे.आता आपली ही लढाई काॅग्रेसवाल्या खोटारड्यांसोबत आहे.त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर ला महायुतीचे अभ्यासु व लोकप्रिय उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांचे घडी चिन्हाची बटन दाबुन प्रचंड मतांनी निवडुन देण्याचे आवाहन भाजपा महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सौ.चित्राताई वाघ यांनी केले आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार इंजि. राजकुमार बडोले यांचे निवडणूक प्रचारार्थ नवेगाव बांध येथे आयोजित तारीख 17 प्रचार सभेत चित्रा वाघ बोलत होत्या. यावेळी प्रदेश महिला मोर्चाच्या महामंत्री रचनाताई गहाणे, उमेदवार बडोले यांच्या पत्नी शारदाताई बडोले, शुभांगी सुनील मेंढे ,शालिनी डोंगरे ,विजया कापगते, गीता ब्राह्मणकर, यशवंत गणवीर ,लोकपाल गहाणे ,रमण डोंगरवार ,जयंत लांजेवार, शितल राऊत, शितलताई गौर, शालिनी डोंगरवार, पुष्पलता दृगकर, सुशीला हलमारे, जयश्री देशमुख, पौर्णिमा ढेंगे व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी रचनाताई गहाणे,शुभांगी मेंढे,शारदाताई बडोले,सुशिला हलमारे यांनीही प्रचार सभेला मार्गदर्शन करुन महायुतीचे उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांना निवडुन देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक रचनाताई गहाणे संचालन महादेव पाटील बोरकर तर उपस्थितांचे आभार विजयाताई कापगते यांनी केले सभेला परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.