तासगाव,दि.१६ः- सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या तासगाव तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद शाळा नं १ चा इयत्ता ६ वीचा विद्यार्थी सोहम माने याची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेकरीता कोल्हापूर विभागातून निवड झाली आहे.खंडाळा जि. सातारा या ठिकाणी झालेल्या विभागीय स्पर्धा खो खो १४ वर्षे खालील मुले या वयोगटातून कोल्हापूर विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
राज्यस्तरीय स्पर्धा दि. १२ , १३ व १४ नोव्हेंबर रोजी डेरवण ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे पार पडली. याठिकाणी राष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या निवडीसाठी ७० मुले सहभागी होती. यामध्ये सर्व मुले माध्यमिक शाळेतील इयत्ता ८ वी मधील क्वचित एखादा ७ वी मधील आणि जिल्हा परिषद शाळेचा व इयत्ता ६ वी मधील सोहम एकटाच पण त्याने अगदी कमी वयात आपल्या खेळाची चुणूक इथे दाखवली. ही निवड चाचणी एकूण चार फेरी मध्ये पडली. दि. १३ रोजी रात्री ९ ते १० पहिली फेरी व दुसरे दिवशी ५ वाजेपर्यंत उर्वरित ३ फेरी मध्ये चाचणी घेण्यात आली. प्रत्येक चाचणी दरम्यान संरक्षण व आक्रमण दोन्ही मध्ये सोहमने आपले कौशल्य दाखविले. वयाने आणि शारीरिक दृष्टीने मोठी असणारी मुलं समोर असणं या गोष्टी मुळे त्याला मर्यादा पडल्या.तरीही त्याच्यात खरा खेळाडू आहे. हे सर्वांनी ओळखले. १४ तारखेला त्याला जेवून घे म्हणून सांगितले तर नाही म्हणाला.
खेळला,लढला,संघर्ष केला.पुढील वर्षी राष्ट्रीय स्तर जिंकण्याची जिद्द मनात ठेवून परतला.विसापूरच्या जिल्हा परिषद शाळा नं १ चा विद्यार्थी राज्यस्तरावर आपली नांदी देवून आला. हाच आज गावाचा, तालुक्याचा,जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे.
चि. सोहम यांस मार्गदर्शन त्याचे आई वडील वर्गशिक्षक दीपक काळेर , विसापूर मधील युवा खेळाडू अभिजित पाटील , धीरज गायकवाड,ऋषिकेश,मयूर,अनिल,रोहीत व सर्व युवा सहकारी तसेच मुनाफ नदाफ,सागर पाटील व शाळा नं १ व २ चे सर्व शिक्षक यांचे लाभले.
जिल्हा परिषद सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.तृप्ती दोडमिसे, शिक्षणाधिकारी सांगली प्राथमिकमोहनराव गायकवाड , गटविकास अधिकारी पंचायय समिती तासगाव किशोर माने,गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड, शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण साहेब , मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रमेश राऊत यांचे लाभले.