मुंबई,दि.२३ः- या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. कॉँग्रेसच्या बड्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.महाराष्ट्रात एकप्रकारे निवडणूकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने सुरु केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव चांगलाच पडला असून दलीत आदिवासी महिलांनीही या योजनेच्या लाभापायी महायुतीला मतदान केल्याचे निकालातून दिसून येत आहे.
या निवडणूकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले,प्रहारचे बच्चू कडू,काँग्रेसचे सुरेश देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या रोहीणी खडसे यांच्यासह अनेकांना पराभवाचा फटका बसला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. आठवेळा जिंकल्यानंतर नवव्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत.थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तित स्थान दिले जाते. याच कारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालेच तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर होते.बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या तरूणाने दारूण पराभव केला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरला. अमोल खताळ यांनी थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावला.
बच्चू कडू यांचा पराभव, अचलपुरात धक्कादायक निकाल
: महायुतीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महायुतीचे उमेदवार १२५ हून अधिक जागांवर पुढे आहेत. तर दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार ५६ जागांवर पुढे असून एका जागेवर विजय झाला आहे. तर अजितदादा गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी खूपच मागे पडली आहे.
मविआ पराभूत उमेदवार
संगमनेर – कॉँग्रेस बाळासाहेब थोरात पराभूत
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हान पराभूत
साकोली – नाना पटोले पराभवाच्या छायेत
ठाणे पाचपाखाडी – ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत