साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निसटता विजय

0
1770

गोंदिया,दि.२३ः-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांचा 214 मतांनी पराभव केला आहे.राज्यातील साकोली मतदार हा संघ हायप्रोफाईल मतदारसंघ होता.राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या मतदारसंघातील लढाई प्रतिष्ठेची करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून अविनाश ब्राम्हणकर यांना भाजपमध्ये प्रवेश देत निवडणूक लढवली.ब्राम्हणकर यांच्या पुर्ण प्रचाराची धुरा आपल्या हाती घेत पटोलेंचा पराभव करण्याचा चंग बांधला होता.मात्र आपल्या मतदारसंघात प्रचाराकरीता कमी वेळ दिल्याच्या फटका पटोलेंना या निवडणूकीत बसल्याने त्यांना निसटता विजय मिळवित प्रफुल पटेलांचे स्वप्न धुळीस मिळविले.