गोंदिया-भंडारा जिल्ह्यात खा.प्रफुल पटेल ठरले किंगमेकर

0
587

गोंदिया,दि.२३ः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा आज निकाल जाहिर होताच परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हेच भंडारा -गोंदिया जिल्ह्याचे राजकीय किंगमेकर असल्याचे स्पष्ट झाले आहे.महायुतीच्या निवडणूक प्रचाराची एक हाती धुरा सांभाळत त्यांनी दोन्ही जिल्ह्यातून नाना पटोले वगळता महाविकास आघाडीचा सुपळा साफ केला आहे.लोकसभा निवडणूकीत झालेला दगाफटका लक्षात घेत यावेळी त्यांनी तब्बल भंडारा-गोंदिया जिल्ह्यात १५ दिवस ठिय्या मांडला होता.या निवडणूकीत कुठल्याही परिस्थितीत महायूतीला पुर्ण जागा जिंकवून देण्याचा त्यांनी घेतलेला मानस पुर्ण करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्याच मतदारसंघात जब्बर धक्का दिला.पटोलेंना अवघ्या २१४ मतांनी विजय मिळवता आला.

गोंदिया जिल्ह्यातील चारही जागा महायूतीच्या पारड्यात पटेल यांनी पाडत विजयाचे आपणच शिल्पकार असल्याचे दाखवून दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व लाडक्या बहिणीच्या मतांनी भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजय मिळविता आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला.गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ७ ही विधानसभा मतदारसंघात रात्रदिवस प्रचाराचा धुराळा प्रफुल पटेलांनी उडविला होता.त्यातच गोंदिया ,अर्जूनी मोरगाव व साकोली विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष देत रात्रीच्यावेळीही बैठका घेत कार्यकर्त्यांना यावेळी कुठलीही चूक नको असे स्पष्ट निर्देश देतच कामाला लावले होते.