अर्जुनी मोर.दि.०९ः-आपल्या घरून शेताकडे पायी जात असताना इसापूर येथील शेतकरी वासुदेव विठोबा लांजेवार (वय 65) यांना आज 9 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास इसापूर माहूरकुडा जोड रस्त्यावर धानाचा कोंडा भरलेला ट्रक उलटला व त्या ट्रकखाली दबुन सदर शेतक-याचा जागीच मृत्यू झाला.
शेतकरी असलेला वासुदेव हा आपल्या शेताकडे जात असताना अर्जुनी मोर वडसा हायवे ओलांडत असताना अर्जुनी मोर कडून वडसा कडे जाणाऱ्या धानाचा कोंडा भरलेला ट्रक क्रमांक एम एच 49 ए टी 32 59 हा ट्रक उलटून त्या ट्रक खाली शेतकरी वासुदेव विठोबा लांजेवार हा दबल्या गेला घटनेची माहिती मिळतात अर्जुनी मोर चे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी आपल्या पोलिसांसह घटनास्थळ गाठुन दोन जेसीबींच्या साहाय्याने मृतक वासुदेव यांचा मृत्यदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे रवाना केले .