गोंदिया,दि.१७ः जिल्ह्यातील देवरी तहसिल अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग शेजारील व्यंकट भोयर यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत निलगायीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.घटनेची माहिती मिळताच देवरी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत मृत निलगायीची तपासणी करुन शेतातच अंत्यसंस्कार केले.