गोरेगाव व गराडा येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
161

गोंदिया,दि.३०ः राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व विकासाला साथ देण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते दुपट्टा वापरून गोरेगाव शहरातील मनीष धमगाये,संजय घासले, गराडा येथील हिवराज राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यां सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेशामुळे पक्षाला भविष्यात निश्चितच बळकटी मिळेल. यावेळी प्रामुख्याने सर्वश्री केवलभाऊ बघेले, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, बाळकृष्ण पटले, नानू मुदलियार, अखिलेश सेठ, रवीकुमार पटले, घनेश्र्वर तिरेले, सुनिल पटले, शैलेश वासनिक, प्रतिक पारधी सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.