तिरोडा पंसच्या सभापती तेजलाल चव्हाण तर उपसभापतीपदी सौ.सुनंदा पटलेची निवड

0
1361

तिरोडा,दि.२०ः तिरोडा पंचायत समितीच्या सर्वसाधारण राखीव असलेल्या सभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणूकीत पंचायत समिती सदस्य तेजलाल सुरजलाल चव्हाण यांची सभापती पदी निवड झाली आहे.तर उपसभापतीपदावर पंचायत समिती सदस्या सौ.सुनंदा अनंत पटले यांची निर्विरोध निवड झाली आहे.दोन्ही पदाकरीता एकच उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी यांनी त्यांना विजयी घोषीत केले आहे.तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती सदस्यामधून तेजलाल चव्हाण व सौ.सुनंदा पटले यांचे नाव सभापती व उपसभापती पदाकरीता भाजपश्रेष्टीनी निवडले.