देवरी,दि.२०ः देवरी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला निवडणूक होत असून सर्वसामान्य करीता राखीव असलेल्या सभापती पदावर गोटाबोडी पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य अनिल बिसेन यांची तर उपसभापती पदावर पालंदूर पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य शालिकराम गुरनुले यांची निवड झाली आहे.भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार यांच्या समक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून दोन्ही पदाकरीता एकच अर्ज असल्याने निवडणूक निर्विरोध पार पडली आहे.