अर्जुनी-मोर.दि.१४ःभाजपा सदस्यता महा अभियान 2025 अंतर्गत भाजपा संघटन कार्यशाळेचे आयोजन नागपूर येथे ता.13 फेब्रुवारीला करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधत गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचा भाजपाप्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी लायकराम भेंडारकर यांना आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी लायकराम भेंडारकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रिय आणी महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.आपला कार्यकाळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवा,सुशासन आणी गरीब कल्याणासाठी घेतलेल्या संकल्पाला पुर्ण करण्यासाठी तसेच सबका साथ सबका विकास या मुलमंत्रावर केंद्रीत असणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र आता थांबणार नाही.याला अनुसरून पुढे कार्य करीत राहणार असा आपला संकल्प राहणार असल्याचे लायकराम भेंडारकर यांनी सांगितले.